Breaking News

पंचकूलातील हिंसाचाराप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रधान चमकौर सिंगला अटक

नवी दिल्ली, दि. 10, सप्टेंबर - गुरमीत राम रहिम यांना बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर पंचकूलामध्ये उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी पंचकूलाचे डेरा  सच्चा सौदाचा प्रधान चमकौर सिंगला अटक करण्यात आली आहे. त्याला चंडीगडच्या सेक्टर-32मधून ताब्यात घेण्यात आले. पंचकूलात हिंसाचार पसरवण्यासाठी  त्याने पाच कोटी वाटल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
पंचकूलात 23 ऑगस्टपासूनच अनुयायी व समर्थकांना पैशांचे वाटप करण्यात आले होते. पंचकूलाचे पोलीस उपायुक्त मनबीर सिंग यांनी सांगितले की, चमकौर सिंग  याच्याव्यतिरिक्त डेरचा आणखी एक पदाधिकारी दान सिंग यालाही अटक करण्यात आले आहे. त्यांना 25 ऑगस्टला उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात  आले आहे. राम रहिमला सुरक्षा पुरवणारे पंजाब पोलीसचे कमांडो करमजीत सिंग यांनाही पतियाळामधून अटक करण्यात आले आहे.