0लखनऊ,दि.9 पत्रकार गौरी लंकेश यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर,ज्येष्ठ साहित्यिक एम. एम. कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्यात यावा, अशी मागणी बहुजन समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी केली. त्या म्हणाल्या की , या चार लेखकांच्या हत्येप्रकरणी केवळ निषेध व्यक्त न करता केंद्र सरकारने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर पावले उचलली पाहिजे. एका पाठोपाठ लेखक, पत्रकार आणि साहित्यिकांची हत्या होत आहे. या चौघांच्या हत्येप्रकरणी देशभरातून निषेध केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणी तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे चौकशी होणे गरजेचे आहे, असेही मायावती यांनी नमूद केले आहे.
खनऊ : ज्ये

Post a Comment

 
Top