0
पुणे, दि. 15, सप्टेंबर - भारती विद्यापीठ पोलिसांनी तब्बल साडेचार किलो अफिमसह एकाला अटक केली. ही कारवाई बुधवार (13 सप्टेंबर) रोजी सायंकाळी  सव्वाचार वाजता धनकवडीत करण्यात आली. यावेळी आरोपीच्या ताब्यातून साडेतेरा लाखाचे अफिम जप्त करण्यात आले. सत्यनारायण शंकर अहिर (वय-32,  रा.गायकवाड, बिल्डींग, आंबेगाव पठार, पुणे, मूळ राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस  ठाण्याचे कर्मचारी धनकवडी परिसरात गस्त घालत असताना सदर इसम संशयास्पद अवस्थेत आढळला. यावेळी त्याच्याजवळील पिशवीची तपासणी केली असता  त्यात साडेतेरा लाख किमतीचे चार किलो 718 ग्रॅम अफीम आढळले. त्यानंतर त्याच्यावर अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला.

Post a Comment

 
Top