0
औरंगाबाद, दि. 16, सप्टेंबर - तारुण्य म्हणजे उत्साह, नाविन्याचा खळाळता प्रवाह. याला योग्य दिशा देऊन आपल्याबरोबरच कुटुंब, समाज, देशाचे नाव उज्ज्वल  करण्याची संधी प्रत्येक तरुणानेआव्हान म्हणून स्वीकारली पाहिजे,’ असे प्रतिपादन रोटरीचे नियोजित प्रांतपाल रो. सुहास वैद्य यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ औरंगाबादतर्फे आयोजित राज्यस्तरीय युवक महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी श्री. वैद्य बोलत होते. व्यासपीठावर या वेळी क्लबचे अध्यक्ष रो. नरेंद्र  खंडेलवाल, सचिव नितीन कंधारकार,
प्रकल्प प्रमुख अमित कोरडे तसेच मिलिंद सेवलीकर, अजिंक्य उजळंबकर,शैलेश तुळापूरकर आदी उपस्थित
होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.

Post a Comment

 
Top