Breaking News

श्याम मानव यांच्यावर कारवाई करा!

भाजप महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 

बुलडाणा, दि. 16, सप्टेंबर - मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असून ही जिल्ह्यासाठी गर्वाची बाब आहे. अंनिस संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी स्व. शुकदास महाराज व विवेकानंद आश्रमावर जे आरोप केले त्याच बरोबर महिला वर्गालासुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे श्याम मानव यांच्यावर कार्यवाही व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांना भाजप जिल्हा सरचिटणीस महिला आघाडीच्या मंदाकिनी कंकाळ यांनी 12 सप्टेंबर रोजी निवेदन दिले. 
अखिल भारतीय साहित्य संमेलन हे विवेकानंद आश्रम येथे होणार असून हा निर्णय महामंडळाचे बहुमताने घेतलेला आहे. साहित्यप्रेमी आनंद व्यक्त करीत आहेत. केवळ पब्लीसीटीसाठी स्व.शुकदास महाराज यांना बदनाम करीत आहेत. स्व.शुकदास महाराज यांनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी घालवले त्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न अंनिस करीत आहे, त्यामुळे अंनिसचे श्याम मानव यांचा जाहीर निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच शाम मानव यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. निवेदन देतेवेळी भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चनाताई पांडे, जिल्हा सरचिटणीस मंदाकिनी कंकाळ, अलका पाठक, रंजना पवार, पद्मजा पारवे, आशाताई झोरे आदींची उपस्थिती होती.