0
औरंगाबाद, दि. 16, सप्टेंबर - हर्सूल परिसरात राहणार्या एका 23वर्षीय महिलेस बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडणार्या पतीसह सासरच्या मंडळीविरुध्द् गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, हर्सूल परिसरात राहणार्या एका तरुणीने 2015 मध्ये संदीप सानप यांच्याशी मंदिरात जाऊन  प्रेमविवाह केला होता. 2015 पासुन 20 ऑगस्ट 2017 पर्यंत तिला नेहमीच शारिरिक आणि मानसिक त्रास देण्यात येत होता. दरम्यान काळात सदरील विवाहिता  तीन वेळा गर्भवती राहिल्याने या गोष्टीचा संदीप सानप, विश्‍वनाथ सानप व विवाहितेची सासुसह इतर नातेवाईक तिचा छळ करीत होते. काही दिवसांपुर्वी या  विवाहितेला या सर्व मंडळींनी दोरीने हातपाय बांधुन तिच्या तोंडात बळजबरीने गर्भपात होणार्या गोळया घातल्या. तसेच संदीपने दुसरे लग्न करुन तिची फसवणुक  केली. सदरील विवाहितेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार करताच पोलिसांनी या सर्व आरोपी
विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

 
Top