Breaking News

सांबा जिल्ह्यातील सिमालगतच्या भागात भुयार सापडले !

जम्मू, दि. 07, सप्टेंबर - जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील सिमेलगतच्या भागात रणगाडाविरोधी भुयार आढळून आले आहे. हे भुयार सुरक्षा दलाने बंद  केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काल रात्री येथील स्थानिक नागरिकांना या भुयाराची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले. त्यानंतर सुरक्षा दलाने घटनास्थळी पाचारण करत  भुयाराची तपासणी केली. आंतरराष्ट्रीय सीमा भागात पाकिस्तान लष्कराकडून अनेक वेळा गोळीबार होत असतो. याच प्रकारच्या एका घटनेमध्ये सीमा सुरक्षा दलाचा  एक जवान जखमी झाला होता. तर ऑगस्टमध्ये जम्मूमधील आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यावेळी भारतीय जवानांनी त्यांना  चोख प्रत्युत्तर दिले होते.