0
नांदेड, दि. 16, सप्टेंबर - केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानाने गुरुवारी स्टेशन रोडवर असलेल्या पंजाब लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केली. बालाजी  मल्लिकार्जुन संगापुरे (वय 41) असे त्याचे नाव असून रांजणी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील हा युवक असून तो आता मुदखेड येथे काम करणार होता.  मुदखेड येथे रुजू होण्यासाठी ते नऊ सप्टेंबरला घरातून निघाला मात्र मुखेडला तो रूजु झाला नाही म्हणून मुखेडच्या त्याच्या कार्यालयातून त्याच्या घरी रांजणीला  फोनही करण्यात आला होता दरम्यान त्याने नांदेड येथेच चार दिवस राहून नंतर आत्महत्त्या केली.

Post a Comment

 
Top