Breaking News

जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंचं जोरदार स्वागत

अहमदाबाद, दि. 14, सप्टेंबर - जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचं अहमदाबादमध्ये जोरदार स्वागत झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिंजो आबे यांच्या स्वागतासाठी  स्वत: अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर हजर होते. शिंजो आबे यांना विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून  जपानचे पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीचं पारंपरिक नृत्य सादर करत स्वागत झालं.
दरम्यान, अहमदाबादमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे यांच्या रोड शोला सुरुवात झाली. विशेष म्हणजे या रोड शोदरम्यान आबे आणि  त्यांच्या पत्नी भारतीय वेशभूषेत दिसले. आठ किमीच्या रोड शोदरम्यान जपानच्या पंतप्रधानांना भारतीय संस्कृतीची विविधता दाखवण्यात आली. या रोड शोदरम्यान  तगडी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.