Breaking News

शहिद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक बनल्या लेफटनंट कर्नल

सातारा, दि. 07 (प्रतिनिधी) : जम्मू कश्मीर येथे प्राणाची बाजी लावून आंतकवाद्यांशी लढा देणार्‍या सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथील शहीद कर्नल संतोष  महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक 9 सप्टेंबरला सैन्यात लेफटनंट पदावर रुजू होणार आहेत. 11 महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांच्या अंगावर सैन्याची वर्दी  चढणार आहे.
नोव्हेंबर 2015 मध्ये कुपवाडा येथे 41 राष्ट्रीय राईफल्स बटालियनचे नेतृत्व करताना आंतकवादी हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. त्यांच्या या  शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कारही दिला होता. ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत प्रशिक्षणासाठी  दाखल झाल्या होत्या. स्वाती महाडिक यांनी गेल्या 11 महिन्यांत स्वत:ला सैन्याच्या शिस्तीत बांधून घेतले आहे. सैन्यात भरती होणं या एकाच उद्देशाने झपाटून  जाऊन त्यांनी प्रशिक्षणार्थींपेक्षा अव्वल राहून त्यांनी आपल्यातील जिद्दीचे दर्शन घडविले आहे. देशसेवेत दाखल होण्याची संधी त्यांना मिळाली.