Breaking News

वडिलांनीच दारूडया मुलाचा खून केल्याचे उघड

हिंगोली, दि. 16, सप्टेंबर - वडीलानेच व्यसनी मुलाचा खून करून त्याने विष पिउन आत्महत्त्या केल्याचा देखावा केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले असुन  पोलिसांनी सदर वडील व त्यांच्या दुसर्‍या मुला विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव परिसरात राहणारा बंडू नारायण डाढाळे याने आजाराला कंटाळून आत्महत्त्या केल्याची तक्रार नातेवाईकांनी केली होती त्या प्रमाणे  गुन्हा दाखल होता. नंतर पोलिसांनी चौकशी केली असता नोतवाईकांच्या जबाबात त्यांना विसंगती वाटली. शवविच्छेदनात मयताच्या शरीरात विषारी द्रव्याचा अंश  नसल्याचे निदर्शनास आले. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमाही होत्या.या पुराव्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच नातेवाईकांनी सत्यकथन केले.
बंडू दारू पिऊन सर्वांना त्रास देत होता. म्हणून त्याला मारहाण केली. तो मृत झाल्याचे कळताच त्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगीतले.  पोलिसांनी बंडूचेवडील नारायण ग्यानबा डाढाळे (वय-55) व भाऊ गोविंद नारायण डाढाळे (वय-27) दोघेही रा.पार्डी खु.ता.वसमत यांच्या विरोधात गुन्हा दाखल  केला आहे.