0
जळगाव, दि. 16, सप्टेंबर - माहिती तंत्रज्ञान प्रकल्प असलेल्या ठिकाणी काम करणार्‍या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना सुचविण्याकरीता महाराष्ट्र शासनाच्या  गृह विभाग ने आय टी महिला सुरक्षा राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, आमदार स्मिता ताई वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात मागील काही दिवसांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या महिलांवर प्राणघातक हल्ले होत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या  महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुचविण्याकरीता वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी, विधानपरिषद व विधानसभा महिला सदस्य यांचा समावेश असलेली समिती  गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने नुकताच शासन निर्णय पारीत केला आहे.
पुणे व इतर शहरात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या महिलांच्या सुरक्षेसाठी अस्तिस्वात उपाययोजनांचा अभ्यास करून महिलांच्या सुरक्षेसंदर्भात विशेष  उपाययोजना सुचविणे अशी समितीची कार्यकक्षा आहे. या राज्यस्तर समितीच्या अध्यक्ष अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला असून, सदस्य म्हणून अतिरिक्त  पोलीस महासंचालक प्रज्ञा सरोदे,विशेष पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागी, आमदार स्मिता ताई वाघ व आमदार डॉ.निलमताई गोर्‍हे, विधानसभेच्या सदस्या आमदार  तृप्ती सावंत, देवयानी फरांदे तर सदस्य सचिव म्हणून महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांचा समावेश आहे.

Post a Comment

 
Top