Breaking News

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या बॅनरमधील हागणदारीमुक्त उल्लेखाबद्दल आयुक्तांची माफी


औरंगाबाद,दि.17  : मराठवाडा मुक्तसंग्राम दिनाच्या बॅनरमध्ये चक्क मराठवाडा हागणदारी मुक्ती संग्राम’ असा उल्लेख केल्यामुळे झालेल्या नाचक्कीमुळे विभागीय आयुक्तावर जनतेची माफी मागण्याची वेळ आली. ु मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक मुख्यमंत्र्याची भेट घेऊन या बाबत तक्रार करणार असल्याची चर्चा आहे. 
मराठवाडा मुक्तसंग्राम दिनाच्या बॅनरमध्ये लातूर व उस्मानाबाद येथील सीईओंनी पाणंदमुक्ती संग्राम वैगरे शब्द वापरून आपली बौध्दिक दिवाळखोरी जाहिर केली . यावर सोशल मिडीयावरून बरिच टीका झाली हे बॅनर शहरात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले. यावर विभागीय आयुक्तांचे नाव असल्याने विभागीय आयुक्त भापकर यांनी मराठवाडयांच्या जनतेची माफी मागितली असून हे बॅनर काढण्याच आदेश दिले आहेत. संबधित अधिकार्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.मात्र मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमात काही स्वातंत्र्यसैनिक मुख्यमंत्र्याची भेट घेऊन याची तक्रार करणार असल्याचीहि चर्चा आहे.