0
औरंगाबाद, दि. 14, सप्टेंबर - पाणी पुरवठया बाबत तक्रार करणारे एमआएचे नगरसेवक तर दुसरीकडे सुरळीत पाणीपुरवठा झाल्याबददल पाणीपुरवठा विभागाचे  अभिनंदन करणारे भाजपचे नगरसेवक असे विरोधाचे चित्र औरंगबाद महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत निर्माण झाले होते शेवटी हा विरोध हामरी तुमरीवर  आला आणि परत एकदा भाजप आणि एमआयएम यांच्यात चांगलाच वाद झाला.
आज बुधवारी महापालिकेची स्थायी समितीची बैठक झाली.त्यात एमआयएमचे नगरसेवक अजीम खान आणि नगरसेविका संगिता वाघुले यांनी पाणी पुरवठा सुरळीत  होत नसल्याची तक्रार केली. तर त्याच वेळी भाजप नगरसेवक राज वानखेडे यांनी आपल्या भागात पाणी पुरवठा सुरु केल्याबद्दल पाणीपुरवठा विभागाचा अभिनंदनाचा  ठराव मांडला. त्यामुळे एमआयएम नगरसेवक अजीम खान आणि भाजप नगरसेवक वानखेडे यांच्यात वाद पेटला शेवटी इतर नगरसेवक आणि सभापती गजानन  बारवाल यांनी अवाहन करून दोघांना गप्प बसवले.

Post a Comment

 
Top