0
नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकामार्फत करण्यात येणार आहे. घटनेच्या तपासासाठी पोलीस  महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी पथक नेमण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरमय्या यांनी आज दिले. लंकेश यांची काल (5 सप्टेंबर) अज्ञात  हल्लेखोरांनी हत्या केली. ही घटना माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची भेट झाली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी जीवे मारण्याच्या  धमकीबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती, असे सिद्दरमय्या यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top