0
इस्लामाबाद, दि. 07, सप्टेंबर - लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घातलेल्या अनेक दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या  भूमीत कार्यरत आहेत, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी येथे दिली.
लष्कर व जैश यांच्या कारवायांवर काहीतरी नियंत्रण आणले पाहिजे. जेणेकरून पाकिस्तानही अशा संघटनांवर कारवाई करत असल्याचे जागतिक स्तरावर दिसून  येईल, असेही आसिफ यांनी सांगितले.
ब्रिक्स देशांचे घोषणापत्र म्हणजे चीनची अधिकृत भूमिका असल्याचे मानले जाऊ शकत नाही. कारण चीन व्यतिरिक्त भारत, रशिया, ब्राझिल व दक्षिण आफ्रिका हे  देशही ’ब्रिक्स’ चे सदस्य आहेत. ब्रिक्सच्या घोषणापत्रात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख केल्याबद्दल आसिफ यांनी चीनची प्रशंसा केली.  तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असून या संघटनेने पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत, असेही आसिफ यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top