0
पुणे, दि. 16, सप्टेंबर - पुणे महापालिकेत सत्तेवर येऊन भाजपला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या सहा महिन्याच्या सुस्त आणि भ्रष्ट कारभाराचा निषेध करीत  राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका भवनासमोर आज, शुक्रवारी आंदोलन केले. यावेळी भाजपच्या कारभाराबद्दल निषेध व्यक्त करणारे फलक हातात घेऊन जोरदार  घोषणाबाजी करण्यात आली.गल्ली ते दिल्ली सर्व ठिकाणी भाजपची सत्ता आहे. तेच चित्र पुणे महापालिकेतही आहे. मात्र गेल्या सहा महिन्यापासून पूर्ण बहुमत  असतानाही भाजपने पुण्याचा विकास केला नसल्याचा आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ’जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलताना राष्ट्रवादी  काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी सत्ताधारी भाजपच्या कारभारावर हल्लाबोल केला. पुणे शहरात दोन खासदार, आठ आमदार आणि तब्बल 98  नगरसेवक असतानाही भाजपला विकास करता आला नसल्याची टीका चव्हाण यांनी केली.यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे, महिला आघाडी शहराध्यक्षा रुपाली  चाकणकर उपस्थित होते.


Post a Comment

 
Top