0
अथेन्स, दि. 09, सप्टेंबर - जागतिक कॅडेट युवा कुस्ती स्पर्धेत भारताच्या सोनम मलिकने सुवर्णपदक पटकावले तर नीलमला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 15 वर्षीय सोनमने जपानच्या सीना नागामोटो हिला 56 किलो वजनी गटात 3-1 अशी मात दिली. नीलमला मात्र विजयासाठी जास्त फे-या खेळाव्या लागल्या. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत नीलमने रोमानियाच्या रोक्साना अलेक्झांड्रा हिला 43 किलो वजनी गटात 6-4 असे पराभूत केले. आता 60 किलो वजनी गटात भारताची अंशू जपानच्या नाओमी रूकी हिच्याविरूद्ध उभी ठाकणार आहे.

Post a Comment

 
Top