Breaking News

सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून खासगी आयुष्य हजारो लोकांच्या हाती

अहमदनगर, दि. 07, सप्टेंबर - स्वतःचे खाजगीपण जपणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.रस्त्याने जाताना जर काहीजण आपल्याकडे निरखून पाहत असतील तर ते  आपल्याला आवडत नाही.मात्र सोशल साईट,फेसबुक,व्हॉटसअपच्या माध्यमातून हजारो अज्ञात आपल्यावर नजर ठेऊन असतात.तरीही अशा ठिकाणी आपण आपले  सगळे खाजगी आयुष्य मोकळे्यक्त करतो. त्यामागील धोका ओळखा.स्वतःचे खाजगी आयुष्य कळतनकळत सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून हजारो अज्ञातांच्या हाती  देतोय का याचा गांभीर्यपूर्वक विचार करा,असे प्रतिपादन अ‍ॅड.पुष्कर तांबोळी यांनी केले.
श्री.रामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनच्या श्री.रामकृष्ण इंग्लिश मेडियम स्कूल व श्री.मोहनलाल रामअवतार मानधना ज्युनिअर कॉलेजमध्ये विदयार्थी व पालकांसाठी सोशल  नेटवर्किंग इन डेली लाईफ या विषयावर आयोजित व्याख्यानात अ‍ॅड.पुष्कर तांबोळी बोलत होते.यावेळी शाळा समितीचे उपाध्यक्ष मोहनलाल मानधना व सदस्य बजरंग  दरक,कॉलेज को-ऑर्डीनेटर संपदा देशपांडे व विदयार्थी उपस्थित होते.अ‍ॅड.तांबोळी म्हणाले,काळानुसार या आधुनिक साधनांचा वापर करावाच लागेल मात्र ते  करताना स्वतःची सुरक्षितता जपण्याची काळजी स्वतःच घ्यावी लागेल.प्रलोभने,बक्षिसाची,नोकरी विषयी आलेल्या मेलची सत्यता तपासा कारण जीवनात झटपट व  मोफत काहीच मिळत नाही हे लक्षात ठेवा.मेहनत व चिकाटी,ज्ञान व स्वतःवर विश्‍वास ठेवा.सतत नवनवीन ज्ञान मिळवत रहा असा सल्ला अ‍ॅड.पुष्कर तांबोळी यांनी  दिला.मोबाईल,इंटरनेट,सोशल नेटवर्किंग साईटस,आँनलाईन शॉपिंग यांनी आपले जीवन कसे व्यापलेले आहे हे अ‍ॅड.तांबोळीनी सांगताना विदयार्थ्यांनी या सर्व गोष्टींचा  वापर जरूर करा परंतु आपली सुरक्षाही जपा असे सांगितले.तांबोळी म्हणाले की,ऑनलाईन साईटच्या टर्म व कंडीशन वाचाव्यात.आपली सुरक्षितता,पोलीस,वकील  यांच्यापेक्षा आपणच जास्त ठेऊ शकतो.यासाठी स्वतःची संपूर्ण माहिती न देणे,प्रत्येक वेळेस सेल्फी न काढणे,विशेषतः मुलींनी स्वतःचे फोटो वारंवार न लावणे  यासारख्या उपाययोजना सांगितल्या.या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी सत्यघटना व सखोल माहिती याद्वारे मुलांशी संवाद साधला.संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गांधी,सचिव  डॉ.शरद कोलते सर,उपाध्यक्ष श्रीगोपाल धूत,शाळेच्या प्राचार्या गीता गिल्डा यांचे मार्गदर्शन लाभले.