Breaking News

काश्मीरमध्ये हुर्रियत नेते आगा सैयद हसन यांच्या घरावर ’एनआयए’चा छापा

जम्मू, दि. 07, सप्टेंबर - राष्ट्रीय तपास यंत्रणेने काश्मीरमधील बडगाम येथे आज हुर्रियत नेते आगा सैयद हसन यांच्या घरावर छापा टाकला. दहशतवाद्यांना आर्थिक  रसद पुरवल्याप्रकरणी तपास यंत्रणेने आज दुस-या दिवशीही काश्मीरमध्ये कारवाई चालू ठेवली. आगा हसन मिर्झा उमर फारूख यांचे निकटवर्तीय असल्याचे  सांगण्यात येत आहे. अंजुमन -ए-शेर-ए-शियाचे माजी अध्यक्ष आगा हसन यांनी 2015 मध्ये हुर्रियत कॉन्फरन्समध्ये प्रवेश केला होता.