Breaking News

सच्चा सौदा आश्रमात सुरु असलेली शोधमोहिम कायदयानुसारच - हंसराज अहीर

नवी दिल्ली, दि. 09, सप्टेंबर - सच्चा सौदा आश्रमात सुरु असलेली शोधमोहिम ही कायदेशीर पद्धतीनेच होत असल्याचे वक्तव्य गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे . पोलीस आपली कारवाई करत असून न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळेच ही कारवाई करण्यात येत आहे. हरियाणा पोलीस आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे आरोपीविरुद्ध जी साक्ष नोंदविण्यात आली आहे त्या आधारावरच शोधमोहिम चालू करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, त्यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येवरही भाष्य केले. गौरी लंकेश यांच्या मारेक-यांना पकडण्यासाठी लवकरात लवकर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पक्षाने या घटनेचा निषेध केला आहे. गौरी लंकेश यांना सुरक्षा पुरविण्याची गरज होती, असेही ते म्हणाले.