Breaking News

रक्तदान, वृक्षारोपणासह विविध उपक्रमांद्वारे सहकार्य गणेश मंडळाने केला गणोशोत्सव साजरा

बुलडाणा, दि. 07, सप्टेंबर - गत तीन वर्षांपासून इको फ्रेण्डली गणेश मूर्ती बनविण्याचे आगळेवेगळेपण अंगीकारणार्‍या सहकार्य गणेश मंडळाने यंदाही इको फ्रेण्डली  गणेश मूर्तीची स्थापना करून पर्यावरणाला हातभार देण्याचा प्रामाणिक केला असून यावर्षी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे.  यावर्षीच्या विविध सामाजिक उपक्रमांद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न सहकार्य गणेश मंडळाने केला आहे. 
सर्वप्रथम 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता महाराणा प्रताप पुतळा परिसरामध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल 33  रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदविला. यावेळी मानकर ब्लड बँक अकोला यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर घेण्यात आले होते.  तर  2 सप्टेंबर 2017 रोजी सहकार्य गणेश मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिखली परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी  महाप्रसादाचा लाभ घेतला.
दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता पुतळा परिसरात सहकार्य फाऊंडेशन अंतर्गत सहकार्य गणेश मंडळाद्वारे तीन लोखंडी बेंच पुतळा परिसरात भेट देण्यात आले.  या छोटेखानी कार्यक्रमाचे उद्घाटन चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच याचठिकाणी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत  पर्यावरण बचाओ या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील वाढते प्रदूषण लक्षात घेता वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी ठाणेदार महेंद्र देशमुख, पत्रकार अनुप  महाजन, डॉ.सत्येंद्र भुसारी, एकनाथराव जाधव, डॉ.अजाबराव वसू, डॉ.विष्णु खेडेकर, प्रमोद काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सहकार्य  फाऊंडेशनचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवादरम्यान घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहकार्य गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रसाद सोळंकी, उपाध्यक्ष  निलेश भुसारी, सचिव निलेश रिंढे, प्रसिद्धीप्रमुख विनोद खरे, कोषाध्यक्ष श्रीकांत सोळंकी, स्वप्नील पाटील, मकरंद भटकर, अमोल इंगळे, अशोक मोरे, श्रेयश  हरलालका, जयेश बेलोकार, संजय कदमप्रा.नितीन वराडे, पंकज जोशी, पंकज भारद्वाज, सुनिल भराड, नितीन जांगीड, चेतन नागवाणी, नंदीप वाघमारे, वचन  वायकोस, निखील खरपास, कुणाल नागवाणी, ऋषिकेश सुरडकर, सुचित भराड, पंकज सोळंकी, शुभम वायकोस, गोपाल राजपूत, प्रणव कोठारी, विजय म्हस्के,  स्वप्नील तवर, अक्षय चोपडे, डॉ.ऋषिकेश डहाके, आशिष गोलाणी,  प्रामुख्याने उपस्थित होते.