Breaking News

सीना धरणाच्या सांडव्यावरून वाहु लागले पाणी

। जि. प. सदस्य तनपुरे यांनी केले जलपूजन

अहमदनगर, दि. 14, सप्टेंबर - तालुक्याला वरदान ठरलेल्या निमगाव गांगर्डा येथील सीनाधरण ओव्हर फ्लो झाल्याने या धरणाच्या सांडव्यावरून आज दि. 13   सकाळी सहा वाजता पाणी बाहेर पडले. या वेळी सर्वप्रथम जलपुजन जिल्हा परीषद मिरजगाव गटाचे सदस्य गुलाब तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या सात  वर्षानंतर यंदा प्रथमच हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे. 
सीना धरण एकदा भरले तर कर्जत तालुक्यातील अनेक गावांचा वर्षभरातील पाणी प्रश्‍न निकाली निघतो. त्या सहावर्षाच्या काळात कर्जत तालुक्यातील कोणतेच धरण  पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. तरीही सीना धरणाच्या पाण्यावर तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवली गेली. परिणामी शासनाचा लाखो रूपयांचा खर्च वाचला.  जनतेला पिण्यास पाणी मिळाले आणि परिसर सुजलाम सुखलाम झाला.
आष्टी तालुक्यातील मेहकरी धरणामध्ये पाच टि एम सी पाणी देऊन उर्वरित पावसाचे पाणी कुकडी, नगर येथील अगदी बायजाबाई जेऊर येथील नदीच्या  उगमस्थानापासून गेले महिनाभर चांगला पाऊस झाल्याने चालू वर्षी सीना धरण पूर्ण क्षमतेने भरले. दरम्यान, आज दि. 13  जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे  सीना धरणाची पाहणी करण्यासाठी येत आहेत.
सीना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे मिरजगाव गटाचे जिल्हा परीषद सदस्य गुलाब तनपुरे यांच्या हस्ते या धरणाच्या पाण्याचे प्रथम जलपूजन करण्यात आले.  यावेळी  एकनाथ गांगर्डे, प्रकाश क्षीरसागर, राजेंन्द घोडके, राऊसाहेब गांगर्डे, संतोष गांगर्डे, मुरलीधर गांगर्डे, प्रविण घाडगे, नाधाजी गांगर्डे, प्रविण घोणे, नंदकिशोर कुरमकर,  बाळासाहेब लोखंडे, मंगेश गांगर्डे, किसन फाळके,  अनिल विटकर,  संतोष गांगर्डे,  प्रदीप सटाले आदी उपस्थित होते.
धरणात पाणी शिल्लक ठेवून आवर्तन सोडा
ओव्हर फ्लोचे  पाणी बंद न करता कायम स्वरूपी कायम करून कायमस्वरूपी आवर्तन सीना धरणातुन मिरजगाव परीसरातील जनतेला मिळावे. या धरणामध्ये  वाढलेली अनावश्यक झाडे तोडून सीना धरणाचे पावित्त्र्य राखावे. त्याचबरोबर आतापर्यंत आष्टी तालुक्यातील मेहकरी तलावात सोडलेले पाणी बंद करून सीना  धरणामध्ये सात टि एम सी पाणीसाठा शिल्लक ठेऊन या पट्ट्यातील शेतक-यांना आवर्तनावेळी सोडावे.