Breaking News

सिनेट , विद्यार्थी सेना रिंगणात


सोलापूर,दि.8 : सोलापूर विद्यापीठ अधिसभेच्या 39 जागांसाणूक जाहीर झाली आहे. भारतीय विद्यार्थी सेनेने पदवीधर गटातून दोन उमेदवारी अर्ज दाखल करून सिनेटच्या निवडणुकीत भगवा झेंडा फडकवण्याचे संकेत दिले आहेत. पदवीधर, प्राध्यापक, संस्थांचे प्रतिनिधी निवडण्यासाठी 25 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सुटा, अभाविप, बहुजन पुरोगामी मागासवर्गीय प्राध्यापक संघटना, मागासवर्गीय प्राध्यापक संघटना, एनएसयूआयची भूमिका लवकरच स्पष्ट होईल. भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे प्रकाश हरी नीळ बाबाराजे सारंग नीळ यांनी पदवीधर गटासाठी खुल्या प्रवर्गातून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव डॉ.पी. प्रभाकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी दाखल करताना भारतीय विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख लहु गायकवाड, रिक्षा सेना जिल्हा प्रमुख सुरेश जगताप, जनसेवा विद्यार्थी संघटनेचे शहर अध्यक्ष निखिल हिप्परगी, प्रतीक्षा शिंदे, सोनाली पाटील, नागेश नीळ, अमर संगा, गणेश शहापूरकर आदी उपस्थित होते.