Breaking News

भटिंडामधील लष्कराच्या शस्त्रास्त्र गोदामाला आग, चौकशीचे आदेश

भटिंडा, दि. 07, सप्टेंबर - भटिंडामधील लष्कराच्या शस्त्रास्त्र गोदामाला आग लागलेली आग नियंत्रणात आली असून त्यात 105 एमएम व 155 बंदुकींच्या  दारूगोळ्याचे नुकसान झाले आहे. लष्कराकडून या आगीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या गोदामातून निरनिराळ्या लष्करी केंद्रांसाठी दारूगोळा  पोहोचवला जातो. पहाटे 5च्या दरम्यान ही आग लागली असून वैद्यकीय पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.
31 ऑगस्ट रोजी निष्काळजीपणामुळे इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी सर्व्हिसेसच्या 13 अधिका-यांना संरक्षण मंत्रालयाकडून निलंबित करण्यात आले होते. ऑगस्टमध्ये  नियंत्रक महालेखा परीक्षकांनी (कॅग ) याबाबतचा अहवाल सादर केला होता.