Breaking News

हिंदुत्ववादी शक्तींविरोधात बोलणा-यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची घटना दुर्दैवी असून हिंदुत्ववादी शक्तींविरोधात बोलणा-यांचा आवाज दाबला  जात असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बोलतात तेव्हा त्याचे दोन अर्थ निघतात. एक अर्थ त्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी असतो तर एक अर्थ तमाम दुनियेसाठी असतो  असे सांगत मोदी हे हिंदुत्ववादी विचारांना बळ देत असल्याची टीका राहुल यांनी केली आहे. हिंदुत्ववादी विचारधारे विरोधात बोलणा-यांचा आवाज दाबला जात  आहे, त्यांना मारहाण केली जाते, मारलेही जाते, असे ते म्हणाले. भारतासारख्या देशात सत्य दडपता येणार नाही. सत्य दडपण्याचा प्रयत्न करण्यांना कधीच यश  मिळणार नाही. लंकेश यांच्या मारेक-याला लवकरात लवकर पकडण्यात यावे, यासाठी मी स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, असे त्यांनी सांगितले.