Breaking News

बीडमध्ये सोनारांचा प्रचंड मोर्चा

बीड, दि. 14, सप्टेंबर - सोनार समाजातील मुलीवर झालेल्या बलात्काराचा निषेध करत आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यासाठी बीड येथे सोनार समाजाच्या  वतीने प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकरणात शीघ्र गती न्यायालयात खटला चालवावा, उज्ज्वल निकम यांना या प्रकरणात सरकारी वकील नेमावे या  मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमपासून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या मोर्चाला सुरूवात झाली. दुपारी 2  वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे मुलांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले. मोर्चासमोर भाषणे होवून  त्यात अत्याचार करणार्‍यास फासावर लटकविण्याची मागणी करण्यात आली.