0
अहमदनगर, दि. 07, सप्टेंबर - शहर व परिसरात गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरु होती. पारंपारिक  वाद्यांच्या तालावर सुरू असलेल्या या मिरवणुकीत अबालवृध्दांनी भाग घेतला. विसर्जन मिरवणूक पाहन्यासाठी युवक, महिला, आबालवृद्धांनी, गणपती पाहण्यासाठी  मोठी गर्दी झाली होती. जोहरापुरशेजारील ढोरा नदीवरही श्रींच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. शेवगावमधील जवळजवळ सर्व गणपती ढोरा नदीवर  विसर्जनासाठी रात्री उशिरापर्यंत येत होते. ढोरा नदीवरील पुलावर पोलिस व महसूल प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता. तसेच याठिकाणी रात्रीच्या वेळी विजेची  सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने या वेळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून  खबरदारी घेण्यात येत होती. शहर व शेजारील खेड्यापाड्यांमध्येही पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार न घडता गणपती  विसर्जन शांततेत पार पडले. उशिरा आलेल्या पावसामुळे तालुक्यात दुष्काळ परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली होती. त्यामुळे  नागरिकांमध्ये उत्साह पहावयास  मिळाला नाही. शहरात रात्री उशिरापर्यंत मानाचा समजला जाणारा लाटे गणपती, भोईराज गणपती, ओम साई मित्र मंडळ, लांडेवस्ती, भगतसिंग मित्र मंडळ, बालाजी  मित्र मंडळ या मंडळांच्या विसर्जन मिरवणुका रात्री  उशिरापर्यंत सुरूच होत्या.

Post a Comment

 
Top