Breaking News

भाजप सरकार हे आदिवासी व मागासवर्गीयांच्या मुळावर : आ.बोंद्रे

बुलडाणा, दि. 07, सप्टेंबर - जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत गत आठ महिन्यांपासून आदिवासींसह मागासवर्गीयांसाठी असणारा निधी अखर्चित असल्याने  आदिवासींसह मागासवर्गीयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याने राज्यातील व केंद्रातील वर्तमान भाजपा सरकार हे मागासवर्गीय व आदिवासींच्या मुळावर घाव  घालण्याचे काम करीत असल्याचा घणाघाती आरोप आ. राहुल बोंद्रे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी बुलडाणा यांनी 4 सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय भवनासमोर  केला.
बुलडाणा जिल्हा काँगेस कमिटीच्या मागासवर्गीय सेल च्या वतीने सामाजिक न्याय भवन बुलडाणा येथे 04 सप्टेंबर 2017 रोजी शासनाचा निषेध करण्यासाठी ढोल  बजाओ आंदोलन आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 34 टक्के निधीपैकी केवळ 4  टक्के आदिवासींवर व केवळ 6 टक्के मागासवर्गीयांवर निधी खर्च झाला आहे. बाकीचा निधी जाणीवपूर्वक खर्च न करता तो इतरत्र वळवीण्यात आला आहे. त्यामुळे  मागासवर्गीय व आदिवासींना विकासापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. अशा असंवेदनशील शासनाला जागे करण्यासाठी व त्यांचे लक्ष वेधण्यासाठी ढोल  बजाओ आंदोलन आयोजित करून निषेध नोंदविण्यात आला आहे.
या प्रसंगी सर्वश्री काँग्रेसचे जेष्ठ नेते मुख्त्यारसिंग राजपूत, लक्षमणराव घुमरे प्रदेश उपाध्यक्ष इंटक, दिलीप जाधव माजी सभापती, सतिष मेंहेंद्रे, सुनिल तायडे ता.  अध्यक्ष, अ‍ॅड शरद राखोंडे शहर अध्ध्यक्ष, नंदकिशोर शिंदे कार्याध्यक्ष, दिपक रिंढे, राजीव काटीकर, समाधान हेलोडे, राजु जाधव अध्यक्ष मागासवर्गीय विभाग, अभय  मोरे शहर अध्यक्ष मागासवर्गीय विभाग, जयश्री शेळके जि. प. सदस्या,  रिजवान सौदागर सरपंच धाड, रसुल भाई, चांदमुजावर, महेंद्र बोर्डे, अमोल तायडे, भागवत  वानेरे, प्रभाकर वाघ, पुरूषोत्तम देवकर, दत्ता काकस, आरिफ खान सरपंच, जगन्नाथ उंबरकर, दलितमित्र शेषराव सावळे-पाटील, श्‍लोकानंद डांगे-पाटील, खंडारे  सर, तेजराव पाटील, भगवान गायकवाड, जाकीर कुरेशी, मुज्जुभाई, शफीकभाई, गजनफर खान, सौ. नंदिनी टारपे, संध्या इंगळे, भाग्यश्री गावयकवाड सरपंच, सुनिल  पनपालिया, संदिप बिलारी, बाळा मोरे, वसंतराव पाटील, साहेबराव चव्हाण, शामराव घट्टे, डॉ. बाभूळकर, विष्णू जाधव, गजानन लांडे पाटील, पंडीतराव निकाळजे,  भिमराव निकाळजे, सुभाष निकाळजे, राजु हिवाळे, विलास सुरोशे, चरणसिंग राजपूत, नानाभाऊ जाधव, तानाजी पालकर, शेख बुढण, हरिदास पठ्ठे, गोपालसिंग  राजपूत, राजधर जाधव, शैलेश खेडकर,  पी.डी महाले, ज्योत्सना जाधव, बानूबी चौधरी, विलास यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने हजर होते.