0
औरंगाबाद, दि. 16, सप्टेंबर - आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी -भटक्या विमुक्तांचे आज खोकडपुरा येथील डॉ. बाबासाहेब  आंबेडकर सामाजिक न्याय भवनासमोर धरणे आंदोलन केले झाले.
या आंदोलनात ओबीसी व भटक्या -विमुक्तांच्या संघटना एकत्रित आल्या होत्या, यावेळी त्यांनी ओबीसी आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास  महामंडळ, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ व संत रविदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाला भरीव  आर्थिक तरतूद करून या महामंडळाच्या केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, या महामंडळाची सर्व कर्ज माफ करण्यात यावीत यासह  इतर मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व मुख्य संयोजक मनोज घोडके, अमीनभाई जामगावकर, संजय मेडे सरस्वती हरकळ यांनी  केले.

Post a Comment

 
Top