0
नाशिक, दि. 07, सप्टेंबर - गणेशोत्सवात मिरवणुकीत डीजेच्या आवाजाची तीव्रता ओलांडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजनक शेलार यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुधबाजार परिसरातील अब्दुल हमीद चौक येथे आवाजाची तीव्रता ओलांडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यानंतर या मित्रमंडळाच्या राहुल उर्फ बबलू शेलार आणि गजानन शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आवाजाची तीव्रता ओलांडल्यानंतर पोलीस यंत्रणेकडून निदर्शनास आणून दिले होते. मात्र पोलिसांच्या आदेशाला झुगाररत डीजेचा आवाज कमी न करण्याची चिथावणी राहुल शेलार याने दिली होती.
तसेच दंडे हनुमान मित्रमंडळाचे संस्थापक गजानन शेलार यांनी हेतू पुरस्करपने डीजे सुरु ठेवून मर्यादेपेक्षा जास्त आवाजाची तीव्रता ठेवण्याकरिता आणि मंडळातील कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन मिरवणूक मार्गात उपद्रव निर्माण केल्याने त्यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेलार यांच्याविरोधात कलम 290, 291, 188, 109, 114, 34 पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत कलम 15 सह ध्वनीप्रदूषण नियम 2000 कलम 5 व 6 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Post a Comment

 
Top