0
मुंबई, दि. 16, सप्टेंबर - बँक खातं, मोबाईल क्रमांक, पॅनकार्डनंतर आता सरकारनं आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सला लिंक करण्याची तयारी चालवली आहे.  डिजिटल हरियाणा समीट 2017 मध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. त्यामुळे लवकरच वाहनचालकांना आपलं ड्रायव्हिंग लायसन्स  आधारशी लिंक करावं लागणार आहे.
आम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आधारसोबत लिंक करण्यावर विचार करत आहोत. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मी नुकतीच या विषयावर चर्चा केली आहे.  लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

Post a Comment

 
Top