0

कोल्हापूर,दि.17  : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी कर्नाटक पोलीस कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्येमधील समानता शोधण्याचे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे. वरील चौघांच्या हत्येमागे विशिष्ट गटाचा हात असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणांचा तपास एकत्रित करावा, अशी मागणी काही जणांकडून केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक पोलीस कोल्हापूरमध्ये आले आहेत.कॉ. पानसरे व गौरी लंकेश यांच्या हत्यांमध्ये वापरलेली बंदूक एकसारखीच असल्याचे तपासात समोर येत आहे. यामुळे दोन्ही हत्यांमधील आरोपी एकच नाही ना याची शक्यता तपासली जात आहे.

Post a Comment

 
Top