0
औरंगाबाद, दि. 06, सप्टेंबर - बिडकीन पाठेपाठ बीडजिल्हयामध्येही गणपती विसर्जन करताना एका मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे. माजलगाव  तालुक्यातील उमरी येथे पांडुरंग महादेव धायतिडक( वय 15)हा मुलगा उमरी नदीच्या पात्रात गणेश विसर्जन करण्यासाठी गेला होता. तेव्हा पाण्यात बुडून मरण  पावला सहा मुलीनंतर त्याचा जन्म झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर गावावर शोककळा पसरली तर औरंगाबादनजीक दौलताबाद तलावाजवळ आकाश साठे (14) या  मुलाचाही गणपती विसर्जन करताना आज दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

Post a Comment

 
Top