Breaking News

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘रयत’ सातत्याने प्रयत्नशील- फाळके

अहमदनगर, दि. 07, सप्टेंबर - येथील रयत शिक्षण संस्थेच्या सोनमाळी कन्या विद्यामंदिर येथे दलितमित्र दादापाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त डिजिटल वर्गाचा  शुभारंभ करण्यात आला. पालक व लोक सहभागातून अंदाजे 70 हजार रुपये किंमतीचे संगणक, प्रोजेक्टर व शैक्षणिक साहित्य वापरून या वर्गाची निर्मिती करण्यात  आली आहे.
 विद्यालयाचे याआधीही दोन वर्ग खोल्या आधुनिक ई-लर्निंग साहित्याने डिजिटल करण्यात आल्या आहेत. या शैक्षणिक वर्षांत सर्व वर्ग डिजिटल करण्याचा मानस  यावेळी संस्था व शाखा प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल चे सदस्य राजेंद्र फाळके कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
फाळके म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील व दलितमित्र दादापाटील यांनी उभारलेल्या शिक्षणरुपी पवित्र कार्याला आधुनिकतेची जोड देणे, हीच या महामानवांना खरी  आदरांजली ठरणार आहे. काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व उपाययोजना आगामी काळात रयत शिक्षण संस्थेच्या  सर्व विद्यालयांमध्ये करण्यात येईल. आगामी काळात शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल होणार आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य राजेंद्र फाळके, उत्तर विभाग सहाय्यक विभागीय अधिकारी खंडेराव शेंडगे, पंचायत समितीचे माजी उपसभापती  किरण पाटील, उद्योजक थोर देणगीदार भीमराव नलवडे, रोटरी क्लब कर्जतचे संस्थापक राहुल सोनमाळी, तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सपकाळ,  प्रा.दामोदर अडसूळ, सुशीला अडसूळ, प्राचार्य सुधाकर खेतमाळस, पालक संघाचे अध्यक्ष आबासाहेब डमरे, उपाध्यक्ष
सुसेन कदम, डॉ. दादा बरबडे, मा. सुंदरदास चव्हाण, भानुदास नेटके,रेवन्नाथ अभंग , अनंतराव पारखे, लालासाहेब शिंदे , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजीवनी  लोंढे,पर्यवेक्षक वसंत चटाले , पालक,शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते.