Breaking News

वृद्धांना आधार व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी सुप्रिया सुळे अरूण जेटलींच्या भेटीला

नवी दिल्ली, दि. 16, सप्टेंबर - आधार कार्डच्या आधारे ओळख पटवण्यात वृद्ध शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना ज्या अडचणी सहन कराव्या लागत आहेत, त्याबद्दल  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतली.
ज्येष्ठ नागरिक, वृद्ध शेतकरी यांना पेन्शन काढताना, रेशन खरेदी करताना आधार व्हेरिफिकेशन होत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. शेतात वर्षानुवर्षे काम  केल्यामुळे अनेकदा वृद्ध शेतकर्‍यांच्या हातावरच्या रेषा झडतात. या बोटांचे ठसे मशीनवर व्यवस्थित घेता येत नाहीत. त्यामुळे मुळात या व्यक्तींना आधार कार्ड  बनवण्यातच अडचणी येतात. सध्या मोबाईल सिम कार्डशीही आधार लिंक करण्याचा सरकारचा आदेश आहे. शिवाय पगार, पेन्शन काढताना इतर सरकारी सबसिडी  मिळवतानाही आधार कार्डचीच सक्ती आहे. त्यामुळे या लोकांना ही गरजेची कामं करताना अडचणी येत आहेत.