Breaking News

पोलीस आयुक्तांच्या केबिनसमोर किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न


औरंगाबाद,दि.8 : चक्क औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या केबीन समोर तेथे डयुटीवर असलेल्या पोलिसांसमक्ष एका व्यक्तीने विषारी औषध पिऊन आज भर दुपारी आत्महत्त्येचा प्रयत्न केला. घटना घडली तेव्हा पोलीस आयुक्त कार्यालयात नव्हते. शेख हनीफ शेख चुन्नू (रा. जयभीमनगर, टाऊन हॉल)यांनी गतवर्षी शेख कैसर उर्फ गोटू तसेच इतरांकडून गतवर्षी नोटबंदीच्या कालावधीत उसने पैसे घेतले होते.या रक्कमेतून त्याने प्लॉट खरेदी केलेले आहेत. त्याने खरेदी केलेले प्लॉट विक्रीसाठी काढले मात्र त्यास आता ग्राहक मिळाले नाहीत तर दुसरीकडे गोटूने पैसे मागण्यास सुरूवात केली. त्यामुळं वैतागलेल्या हनीफने तक्रार अर्ज घेवून पोलिस आयुक्तालय गाठले.आयुक्त कार्यालयात येण्याची वेळ निश्‍चीत नसल्याने तो प्रतिक्षा करत केबीन बाहेर बसला दुपारी एकच्या सुमारास पाणी पिल्यासारखे त्याने एंड्रोनिल नावाचे किटक नाशक गटागटा प्यायले. तेथे उपस्थित पोलिसांनी त्याच्या हातातील बाटली घेतली आणि निवेदनही घेतले आणि त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार चालु आहेत.