0
नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी 2016 मधील रस्ते अपघाताचा अहवाल आज सादर  केला. सर्वाधिक रस्ते अपघातात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर, तामिळनाडू दुसर्‍या आणि महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे. तर भारतात सर्वाधिक अपघात होणार्‍या  शहरात दिल्ली अव्वल स्थानावर असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरात प्रत्येक तासाला 55 अपघात होत असून दर तासाला 17 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वर्ष 2015  च्या तुलनेत रस्ते अपघातांच्या संख्येत 4.2 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र अपघातातील मृतांचे प्रमाण 3.2 टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी 4 लाख 80 हजार  652 रस्ते अपघात झाले असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.

Post a Comment

 
Top