Breaking News

‘स्वाईन फ्ल्यू’ आजारामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये - डॉ. कलशेट्टी

नंदुरबार, दि. 16, सप्टेंबर -‘स्वाईन फ्ल्यू’ हा एक संसर्गजन्य आजार असून एका संक्रमित व्यक्तीकडुन दुसर्‍या व्यक्तीकडे प्रसारीत होतो. स्वाईन फ्ल्यूमुळे कोणीही  घाबरून जाऊ नये यावर लवकर निदान व लवकर उपचाराने स्वाईन फ्ल्यू बरा होतो. नागरिकांनी सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांनी  त्वरीत नजीकचा शासकीय किंवा खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांना भेटून उपचार करून घ्यावा. यामध्ये योग्य व लवकर उपचार झाल्यास मृत्युचा धोका नसतो.  स्वाईन फल्यु आजाराबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आढावा बैठकीत संबंधितांना दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली स्वाईन फ्ल्यू बाबत आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली.  त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के.डी.  सातपूते, जिल्हा आरोग्य अधिकारी आर. बी. पवार, आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. राजेश वळवी, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. राजेश वळवी यांनी स्वाईन फल्यु बाबत माहिती देताना सांगितले की रुग्णांच्या नाकातील व घशातील स्त्राव तसेच थुंकीमार्फत या आजाराच्या विषाणुच्या प्रसार  होतो. ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, घशात खवखव होणे, शिंका येणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे, अंगदुखी इ. या आजाराची महत्वाची लक्षणे आहेत. 5  वर्षाखालील मुले, वृध्द व गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह, मुत्रपिंडाचे आजार, यकृत, फुफ्फसाचे आजार असलेल्या व्यक्ती , प्रतिकारशक्तीचा र्‍हास झालेले रुग्ण,  दिर्घकाळ स्टीरॉईडची औषधे घेणार्‍या व्यक्ती अशा लोकांना या आजाराची लागण लवकर होते.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सातपूते यांनी स्वाईन फल्यु चे निदानासाठी रुग्णाच्या घशातील व नाकातील द्रव्य पदार्थाचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत  पाठवावा लागतो. हा स्वाब व्हायरल ट्रान्यपोर्ट मेडिया मध्ये घेतला जातो. या तपासणीसाठी महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे सुविधा उपलब्ध आहेत.  या रोगाचे उपचार जिल्हा रुग्णालयात उपलब्ध् आहेत. लवकरात लवकर म्हणजे लक्षणे दिसून आल्यास 2 दिवसात उपचार सुरू केल्यास औधषाने उत्तम गूण येतो.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी स्वाईन फल्यु बाबत सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये एनफल्युएंझा क1छ1 या विषाणुमूळे होतो. याचा अधिशयन  काळ हा 1 ते 7 दिवसांचा आहे. बाधित रुग्णापासून हा आजार प्रसारीत होत असल्याने रुग्णाच्या निकट सहवास असणार्‍या व्यक्तीस आजार होण्याची शक्यता जास्त्  असते. हा आजार टाळणेसाठी आपले हात नेहमी साबण पाण्याने स्वच्छ धुवावेत. गर्दीमध्ये फल्यू बाधित रुग्णाशी संपर्क येत असतांना तोंडावर मास्क लावावा.  धुम्रपान करणे टाळावे. भरपुर प्रमाणात पाणी प्यावे. पुरेशी झोप घ्यावी. श्रमाचे काम करणे टाळावे. सर्वांनी आपले आरोग्य जपावे.