Breaking News

पंचकुलामध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी ’डेरा’ कडून आर्थिक पुरवठा

नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला अटक केल्यानंतर पंचकुलामध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी ’डेरा’ कडून पाच कोटी रुपये  पुरविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने राम रहीमला बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षाची  शिक्षा सुनावली आहे.
राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या काही वेळातच हरियाणातील पंचकुला आणि अन्य पाच राज्यांमध्ये डेरा समर्थकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. या  हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू झाला. हिंसाचार माजविण्यासाठी चमकौर सिंह आणि डॉक्टर नैन यांना डेराकडून 5 कोटी रुपये पुरविण्यात आले होते अशी माहिती  सूत्रांनी हरियाणा पोलिसांना दिली.