Breaking News

उद्यान आणि वृक्ष संवर्धन प्राधिकरणाच्या कामकाजाची विभागणी

पुणे, दि. 15, सप्टेंबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष संवर्धन प्राधिकरणाच्या कामकाजाची विभागणी करण्यात आली आहे. कामाची जबाबदारी  निश्‍चित करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी दिली.पिंपरी महापालिकेत उद्यान आणि वृक्ष संवर्धन प्राधिकरण विभाग आहेत. हे  दोन्ही विभाग पूर्वी स्वतंत्र होते. मध्यंतरी ते एकत्र करण्यात आले. आता ते पुन्हा स्वतंत्र करण्यात येणार आहेत. वृक्ष प्राधिकरणाची जबाबदारी उद्यान अधिक्षक  प्रकाश.एम. गायकवाड यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांची जबाबदारी निश्‍चित केली आहे. झाडाची फांदी तुटली तरी त्याला वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार  असणार आहेत. उद्यान विभागाची जबाबदारी उद्यान अधिक्षक दत्तात्रय.एन. गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. उद्यान विभागाचा ना हरकत दाखला  उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे देत होते. आता अधिकारांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. 20 हजार चौरस मीटर पर्यंत ना हारकत दाखला देण्याचे अधिकार  दत्तात्रय गायकवाड यांना देण्यात आले आहेत. तर, 20 हजार चौरस फुटापुढील ना हरकत दाखला देण्याचे अधिकार उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे यांच्याकडे  देण्यात आले आहेत.