Breaking News

मनपा हद्दीतील बार आणि दारूची दुकाने आजपासून सुरू

पुणे, दि. 07, सप्टेंबर - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दुतर्फा मानवी पावलांच्या पाचशे मीटर अंतरावर असलेल्या मद्यविक्री  बंदीचा आदेश महापालिका हद्दीपुरता शिथिल करण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार महापालिकेच्या हद्दीतून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्गांलगतच्या मद्यविक्री  करणारे दुकाने, हॉटेल आणि बार सुरू करण्याचे राज्यसरकारने आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 350 हून जास्त मद्यविक्री दुकाने,  हॉटेल आणि बार बुधवारपासून सुरू करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारूच्या दुकानांबरोबरच बार, दारू विक्री करणारी  रेस्टॉरंट आणि पब चालविण्यास मनाई केली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील 25 हजार 513 दारू विक्रीच्या परवान्यांपैकी 15 हजार 699 दुकाने  बंद झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या नव्या आदेशामुळे मनपा हद्दीतील रेस्टॉरंट बार आणि दारूची दुकाने आजपासून सुरू झाली.