0
अहमदनगर, दि. 14, सप्टेंबर - अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये  भारनियमनविरोधात आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांनी आमदार जगताप यांना ताब्यात घेतलं.
राष्ट्रवादी काँग्रेसने तीन दिवसांपूर्वी आंदोलन केल्यानंतर, महावितरण अधिकार्‍यांनी गुरुवारपासून भारनियमन बंद होईल असं लेखी आश्‍वासन दिलं होतं. मात्र  महावितरणने काल संध्याकाळी भारनियमनचे नवीन वेळापत्रक जारी करत, भारनियमन चालूच राहणार असल्याचे सांगितलं. त्यामुळे राष्ट्रवादीने महावितरण  कार्यालयात आंदोलन केले. महावितरणनं जगताप यांना 14 तारखेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचं अश्‍वासन दिलं होतं. मात्र आजही भारनियमन कायम असल्यानं  कार्यकर्ते महावितरणमध्ये जमायला लागले होते. म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले.

Post a Comment

 
Top