0
जळगाव, दि. 14, सप्टेंबर - महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी खान्देश विकास आघाडीच्या गणेश सोनवणे यांनी नगरसचिव यांच्याकडे तीन नामनिदर्शन पत्र  दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप वगळता महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी सोनवणे यांचा  ऐकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित मानली जात आहे.
नितीन लढ्ढा यांनी जळगाव महापालिकेच्या महापौरपाचा राजीनामा दिल्यानंतर माजी उपमहापौर ललित कोल्हे यांची महापौरपदी सर्वपक्षीय पाठिंब्यावर निवड झाली.  त्यानतंर रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी बुधवारी विशेष सभा होत आहे. त्यासाठी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी  शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी ठरल्यानुसार खान्देश विकास आघाडीचे गणेश सोनवणे यांनी तीन अर्ज दाखल केले.
महापालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात नगरसचिव अनिल वानखेडे यांच्याकडे हे अर्ज दाखल करण्यात आले. पहिल्या अर्जात सूचक म्हणून नितीन लढ्ढा,  अनुमोदक म्हणून संदेश भोईटे, दुसर्‍या अर्जात सूचक म्हणून रमेश जैन अनुमोदक म्हणून किशोर पाटील उपस्थित होते.
यावेळी महापौर ललित कोल्हे, नगरसेवक अनंत जोशी, संतोष पाटील, खावआचे नेते रमेश जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनील महाजन  यांच्यासह भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.
अर्ज दाखल करण्याची शेवटच्या दिवशी गणेश सोनवणे यांचाच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित मानली जात आहे. बुधवारी (दि.13) होणार्‍या सभेत  या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

Post a Comment

 
Top