Breaking News

ब्ल्यू व्हेल : राजस्थानात तरुणीचा दुस-यांदा आत्महत्येचा प्रयत्न

जोधपुर, दि. 07, सप्टेंबर - राजस्थानमधील जोधपुरमध्ये 17 वर्षीय तरुणीने ब्ल्यू व्हेल गेमच्या नादी लागून दुस-यांदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला  रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागायात आले आहे.
ब्ल्यू व्हेल गेमचा शेवटचा टास्क पूर्ण करण्यासाठी तिने सोमवारी रात्री तलावात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील नागरिकांनी तिला बाहेर  काढून तिचा जीव वाचवला. तिला समुपदेशनासाठीही पाठवण्यात आले. मात्र आज पुन्हा तिने झोपेच्या गोळ्या घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही  तरुणी सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे.