Breaking News

दिल्लीमध्ये बनावट नोटा छापणारा अटकेत

नवी दिल्ली, दि. 10, सप्टेंबर - दिल्लीमध्ये बनावट नोटा छापणा-या आणि बाजारात विकणा-या एकाला आज अटक करण्यात आली. नोटांमध्ये 100 आणि 500  रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. समीर खान असे त्याचे नाव आहे. समीरकडून 47 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 
बनावट नोटा छापणारी टोळी दिल्लीमध्ये आहे, अशी माहिती मिळताच तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर केलेल्या कारवाईत समीरच्या घरातुन 500 रुपयांच्या  35 आणि 100 रुपयांच्या 80 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या कामात समीरला मदत करणा-या त्याच्या सहका-याचा शोध सुरू आहे, असे पोलीस  उपायुक्त मंदीप सिंग रंधावा यांनी सांगितले.