0
इस्लामाबाद, दि. 09, सप्टेंबर - पनामा पेपर घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह सहा जणांविरोधात भ्रष्टाचाराशी संबंधित कलमांतर्गत आज चार गुन्हे दाखल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाकडून 28 जुलै रोजी शरीफ यांना दोषी करार दिल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू झाली. शरीफ आणि अन्य जणांविरोधात सहा आठवड्यांच्या आत खटला दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या प्रकरणात शरीफ यांच्यासह पुत्र हसन, हुसैन, मुलगी मरियम, जावई मुहम्मद सफदर व अर्थमंत्री इशाक डार या सहा जणांचा समावेश आहे.

Post a Comment

 
Top