Breaking News

बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईचेे उदयोग गुजरातला हलवण्याचा डाव

औरंगाबाद, दि. 15, सप्टेंबर - मुंबई ते अहमदाबाद सुपर फास्ट बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईचे सगळे उदयोग गुजरातला हलवण्याचा मोदी सरकारचा डाव  असल्याचा आरोप आज शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी केला. ते औरंगाबाद येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते तेंव्हा पत्रकारांशी त्यांनी संवाद  साधला.
सदर प्रकल्पासाठी एक लाख कोटी रूपये खर्च होणार आहेत .याचा काही भार राज्यावर पडणार आहे तो न टाकता केंद्राच्या माध्यमातूनच या प्रकल्पाचा खर्च करावा  अशी मागणी त्यांनी केली.मुंबईचे महत्व कमी करण्याचे आतापर्यंत असे अनेक प्रयत्न झालेत ते वेळोवळी ते हाणून पाडलेत आताही चालु असलेले प्रयत्न यशस्वी होवू  देणार नाही असे ते म्हणाले.