Breaking News

निर्भिड महिला पत्रकाराच्या खूनी हल्ल्याचा निषेध

अहमदनगर, दि. 07, सप्टेंबर - निर्भिड महिला पत्रकार आणि उजव्या विचारसरणीच्या परखड टीकाकार गौरी लंकेश यांचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात  आला या भ्याड घटनेचा जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
यावेळी पञकार मिठ्ठूलाल नवलाखा, आशोक निमोणकर, यासीन शेख, प्रकाश खंडागळे, लीयाकत शेख, समीर शेख, संजय वारभोग आशोक वीर, नंदूसिग परदेशी,  मोहिद्दीन तांबोळी, फारूख शेख भरत पाठक नासीर पठाण, अविनाश बोधले, ओंकार दळवी सूदाम वराट , राजू भोगील आदी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते .
यावेळी सदर घटनेचा निषेध करत पत्रकारांनी केलेल्या आंदोलनाला लोकाधिकार आंदोलनाचे अध्यक्ष अरुण जाधव, अरूण डोळस, गूलाब जांभळे  बापू ओव्हळ  संतोष गर्जे राकेश साळवे  आदींनी पाठिंबा दिला. वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश ह्यांना अज्ञात हल्लेखोरांनी जवळून तीन गोळ्या घालून हत्या  केली. त्या मागील काही दिवसांपासून वैचारिक भूमिकेमुळे उजव्या विचारधारेच्या लोकांच्या निशाण्यावर होत्या. त्या प्रसिध्द कन्नड कवी पी. लंकेश यांच्या कन्या  होत्या व लंकेश पत्रिके नावानी एका पत्रिकेचे संपादन करीत होत्या.