Breaking News

माजलगावच्या माजी उपनगराध्यक्षांच्या घरावर दरोडा

बीड, दि. 15, सप्टेंबर - बीड जिल्हयात अजूण दरोडयाचे सत्र चालु असून माजलगावचे माजी उपनगराध्यक्ष रामराव रांजवन यांच्या घरावर आज पहाटे  दरोडेखोरांनी हल्ला करून त्यांच्यावर धारदार वार करून घरातील पैसे व दगिने घेवून ते फरार झाले. 
चोरांनी रामराव रांजवन यांच्या घराच्या गेट चे कुलूप तोडून आत प्रवेश केला रांजवन यांच्या वर चाकूने हल्ला करत लुट केली, चोरटे हिंदीत बोलत होते,रांजवन  यांच्या हातावर वाराचे घाव आहेत. बीड जिल्हयात एका महिन्यात तीन दरोडे झाले असून गेवराईतील दरोडयात दोघांचा खून झाला होता.